Psalms 94

1हे परमेश्वरा, देवा तुझ्याकडे सूड घेणे आहे,
तुझ्याकडे सूड घेणे आहे; तू हे देवा आपले तेज प्रगट कर.
2तू पृथ्वीच्या न्यायाधीश, ऊठ,
गर्विष्ठांना त्यांचे उचित प्रतिफल दे.

3हे परमेश्वरा, दुष्ट किती काळ,

दुष्ट किती काळ विजयोत्सव करतील?
4ते अवमानित आणि उर्मटपणे बोलतात
आणि फुशारकी मारतात.

5हे परमेश्वरा, ते तुझ्या लोकांना चिरडतात;

जे तुझ्या मालकीचे राष्ट्र आहे त्यांना ते पीडितात.
6ते विधवांना आणि उपऱ्यांचा जीव घेतात,
आणि ते अनाथांचा खून करतात.
7ते म्हणतात की, परमेश्वर बघणार नाही,
याकोबाचा देव लक्ष देत नाही.

8अहो तुम्ही मूर्ख लोकांनो, समजून घ्या;

मूर्खांनो, तुम्ही कधीपर्यंत शिकणार आहात?
9ज्याने आपला कान घडविला तो ऐकणार नाही काय?
ज्याने आपला डोळा बनविला तो पाहणार नाही का?

10जो राष्ट्रांना शिस्त लावतो, तो शिक्षा करणार नाही का? जो मनुष्यांना ज्ञान शिकवतो.

तो अज्ञानी असणार का?
11परमेश्वर माणसांचे विचार जाणतो,
ते भ्रष्ट आहेत.

12हे परमेश्वरा ज्या माणसाला तू शिस्त लावतोस,

ज्याला आपल्या नियमशास्रातून शिकवितोस तो आशीर्वादित आहे.
13दुष्टासाठी खाच खणली जाईपर्यंत
तू त्याला संकटसमयी विसावा देशील.

14कारण परमेश्वर आपल्या लोकांना किंवा आपल्या वतनाला सोडून देणार नाही.

15कारण न्याय नितीमानाकडे वळेल;
आणि तो सरळ मनाचे सर्व तो अनुसरतील.
16माझ्यासाठी दुष्कर्म करणाऱ्याविरूद्ध कोण लढेल?
अन्याय करणाऱ्याविरूद्ध माझ्यासाठी कोण उभा राहिल?

17जर परमेश्वराने मला मदत केली नसती,

तर माझा जीव निवांतस्थानी कधीच जाऊन पडला असता.
18जेव्हा मी म्हणतो, माझा पाय घसरला आहे,
तेव्हा, परमेश्वरा, तुझा विश्वासाचा करार मला उचलून धरतो.
19जेव्हा माझे मन खूप चिंताग्रस्त होते तेव्हा तुझ्यापसून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाला आनंदित करते.

20जे दुष्टपणाचे राजासन कायद्याने अरिष्ट

योजते ते तुझ्याशी संबंध ठेवाल काय?
21ते नितीमानाच्या जिवाविरूद्ध एकवट होतात,
आणि निर्दोष्यांस देहांत शिक्षा देतात;

22परंतु परमेश्वर माझा उंच बुरुज आहे,

आणि माझा देव मला आश्रयाचा खडक आहे.
त्याने त्यांचा अन्याय त्यांच्यावरच आणला आहे;
आणि त्यांच्याच दुष्टपणात तो त्यांना नाहीसे करील.
आमचा देव परमेश्वर त्यांना नाहीसे करील.
23

Copyright information for MarULB